Quarantine Time, Black & White अन् अक्लूज डेज

By Pravin Gaikwad 25th March 2020 | 6min Read

Black & White ला आपण मराठीत कृष्णधवल असं म्हणतो. मी काही दिवस अक्लूजमध्ये माझ्या फार्म हाऊस येथे आहे. बरेच black/white फोटोज् मी काढले अन् विचार करता करता काही लिहिले.

Black/White सिनेमे किंवा फोटोज् चा काळ बऱ्यापैकी आपल्या पिढीने बघितला. ते सारे सोनेरी दिवस होते की काय असंच आता वाटतंय. स्वातंत्रपूर्व काळापासून ते अग्दी १९८२ पर्यंत म्हणजे भारतात त्यावेळेस एशियाई खेळ झाले तो पर्यंत कृष्णधवलचाच काळ होता असं म्हणायला हरकत नाही. सिनेमा, टिव्ही शो, वृत्तपत्रे सगळीकडे black & white चा जमाना होता. आता सगळं कलरफुल असून तेच भारी होतं असं वाटतं कधी कधी!

या black white गोष्टींचा आपल्यालर परिणाम झालेला दिसतो. ते तसे दोन महत्वाचे रंग आहेत. काही लोकांना कमी दिसतं तर त्यांना याच दोन रंगात दिसतं. बरं आपल्याकडं काय झालंय… उगाच काही गोष्टींना बंधनात अडकवलंय. काळा म्हणजे वाईट व पांढरा म्हणजे चांगला. पण आज मी अक्लूजचे जे black white फोटोज् तुम्हाला पाठवतोय जर ते तसे नसले असते तर त्याची खरी beauty तुम्हाला दिसली नसती. त्याचे Features किती सुंदर आहेत. त्यांच्यातला rawness माझ्या मनाला भावतो. काही फोटोंमध्ये तर shadows किंवा lighting भारी दिसते.

हेच दोन रंग बघा ना आखाती देशात किती महत्वाचे आहेत. Gulf Countries मध्ये महिला काळ्य रंगाचा वेश परिधान करतात तर पुरुष पांढऱ्या. दोघंही तितकेच महत्वाचे… रंग व महिला-पुरुष! पुढे जाऊन विचार केला तर अफ्रिका खंडात बरेच लोक रंगाने काळे आहेत. त्यांना या जगाने पटकन स्वीकारले नाही. परंतु यातीलच एक जण अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष होतो तो म्हणजे बरॅक ओबामा. त्याच बरोबर नेलसन मंडेलानी मोठा लढा त्यासाठी दिलेला दिसतो. काही वर्षांपासून आता अमेरिकन्स व युरोपियन्स हे अफ्रिकन्सशी लग्न करताना दिसतात आणि तेसेच vice versa देखील घडले. सांगायचे तात्पर्य काय तर Racism किंवा Discrimination संपवण्याच्या दृष्टीने काही पावलं पडली. Black & White हे combination भारी होऊ शकतं हे जगाला पटलं. अर्थात काही ठिकाणी अजून अपवाद आहेच. आपल्याला सर्वांना मिळून त्यावर मात करावी लागणार आहे.

आपण नीट वागलो तर सृष्टी/निसर्ग आपल्याशी नीट वागेल. सध्या कोरोनाच्या निमित्ताने जगाला भिती बसली आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे व तो सतत होत राहणार आहे. सारेच रंग सुंदर असतात पण आपण त्यांना धर्म व जातीच्या चौकटीत अडकवलंय याचं वाईट वाटतं.

Black & White नी अनेकांना अठवणी दिल्या आहेत. काही लोक त्याला ancient times असं म्हणतात तर काही लोक सुवर्णकाळ. Black White फोटोज् किती सुंदर दिसतात याचं उदाहरण म्हणून मी हे लिहितोय. कृष्णधवल पेटिंग्ज किंवा सिनेमे हे काहींसाठी लाईफ टाइम मेमोरिज आहेत. आपण रंगांशी unfair नाही वागलो पाहिजे. रंग न बोलताच आपल्याशी खूप काही बोलून जातात.

मी माझ्या वेगवेगळ्या angles ने हे फोटोज् काढले आहेत. आशा आहे तुम्हाला ते आवडतील. या Quarantine च्या काळात आपण सारे black & white सारखे घट्ट होऊया. नाती जपूया. एक दुसऱ्याला फोन करुन विचारपूस करुया. काळजी घेऊया. आयुष्य सुंदर आहे कर जिंदगी वसूल करुया. शेवटी एवढंच म्हणेल, ‘A picture/photo is worth a thousand words.’

 

लेखक - प्रविण गायकवाड

लेखक हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते सामाजिक बांधिल्की जपणारे यशस्वी व्यवसायिक आहेत. तसेच त्यांनी विविध सामाजिक विषयांवर २५ हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्याचबरोबर जगभरातील जवळपास ६५ देशांची भ्रमंती केली आहे.