By
9th April 2020 | 3min Read
“I Love You,” असा जोरात आवाज आला परंतु त्या दोन व्यक्ती स्पर्श करण्यासाठी एकमेकांपासून दूर होत्या.
“समोरासमोर उभं राहण्याची ही आपली एकमेव संधी आहे,” असं वॉल्टर, जो की स्वित्झर्लंडचा असून त्याच्या घरापासून एक तास गाडी चालवत तो त्याच्या जर्मन असलेल्या प्रेयसी माजा बुलीकला म्हणाला.
“आपण कमीतकमी एकमेकांशी बोलू तर शकतोय. तेवढंच काय ते समाधान,” असे तो पुढे म्हणाला.
दोन अडीच तास माजा बुलीकने वॉल्टरला भेटण्यासाठी गाडीने प्रवास केला होता. ती म्हणाली, “कधीतरी आपल्याला कुणाला व्यक्तिश: भेटायला, बघायला पाहिजे. हे सारं कठीण आहे, परंतु मला माहित आहे की एक दिवस नक्कीच वेगळा असेल.”
महामारीच्या संकटामुळे जर्मनी – स्वित्झर्लंडची सीमा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बंद करण्यात आली आहे. एका लहान सरोवराच्या जवळ जिथे एक देश संपतो तर दुसरा सुरु होतो तेथील हा संवाद. जर्मन्स स्वित्झर्लंडला जाऊ शकत नाही तर स्विस नागरिकांना जर्मनीकडून प्रतिबंधित करण्यात आलं आहे.
रविवारच्या दुपारी प्रेमी, भाऊ बहिण, पालक व त्यांची मुले आणि कितेक म्हाताऱ्या मित्रांनी त्या कुंपणाजवळ उभं राहून गर्दी केली. गेले कितेक आठवडे त्यांनी फेसटाइमवर, किंवा फोनवर संवाद साधला होता. परंतु फायबर ऑप्टिक हा काही नात्याला पर्याय होऊ शकत नाही. आज सिमेवरील कुंपण हा साथीच्या आजाराने विभाजित झालेल्या लोकांसाठी एक बैठक स्थळ बनलं आहे. मार्च महिन्याच्या मध्यात हे कुंपण टाकण्यात आलं. जवळपास २०-२५ दिवस त्याला होत आले.
अनेक लोकं नियमांचं उल्लंघण करुन एकदुसऱ्याला बिअर देत होते. कोणी पत्ते खेळत होतं तर कोणी सहा फुटाच्या अंतरावरुन ‘flying kiss’ देत होतं. “मला तर हे तुरुंगात असण्यासारखे आहे!” असं वेरोनिका समोरच्या मैत्रिणीला ओरडून सांगत होती.


डोमिनीक लोरोफ व मिशेल ग्राफ-लुडिन तर काही तास प्रवास करुन आपल्या प्रियकर-प्रेयसीला स्पर्श करायला आले होते. स्पर्शात वेगळीच ताकद असते. “जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या भवितव्याचा विचार करतो तेव्हा हे वाईट आहे. जर ते अद्याप फक्त एक कुंपण असेल तर ते ठीक आहे. दुसरे कुंपण फार कठीण आहे,” लोरोफ त्याच्या प्रेयसीला म्हणाला. सीमा कुंपणामध्ये सहा फुट अंतर असल्यामुळे स्पर्श तर करता आलाच नाही परंतु त्यांना एकदुसऱ्याला फक्त ‘चॉकलेट’ देऊन स्वत:चं मन मारावं लागलं.
खरंच प्रेमाला सीमा नसते!
