आयुष्य थांबत नसतं…

By Pradnyesh Molak 23rd March 2020 | 2min Read

सध्या कोरोना विषाणू जगभर आहे. जगातील खूप साऱ्या गोष्टी ठप्प झालेल्या दिसत आहेत. पुढील काही महिने आपल्या सर्वांसाठीच कठीण आहेत. सरकार व यंत्रणा त्यांच्या परीने सर्व क्षमतेने कार्यरत आहे. काम करत आहे. आपल्या सर्वांनाच मोठी शिकवण या काळात भेटत आहे. मी अजिबात ‘ग्यान’ वगैरे देणार नाहीये. सहज वाटलं म्हणून लिहितोय.

Quarantine/Isolation अशा काही गोष्टींशी आपला तसा नविनच परिचय झालाय. आता यात काय करायचे आणि कसं करायचे हा मोठा प्रश्न सर्वांना आहेच. परंतु हा कोरोनाचा काळ बाजूला ठेवला तरीही इतरत्रसुद्धा आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नसतं. ते पुढे पुढे सरकत जाते व बऱ्याच गोष्टी मागे पडत जातात.

बऱ्याच लोकांशी बोलताना आपण स्वत: घडत असतो. आपण जगत असताना भरपूर गोष्टी करायच्या राहून जातात आणि मग पुढे गेल्यावर त्याची खंत वाटते. आपण नंतर Regret करतो. त्यापेक्षा आता या छोट्या गोष्टीत निखळ आनंद घेत जगलं पाहिजे. नवनविन गोष्टी Try केल्या पाहिजेत. चांगलं किंवा वाईट ते नंतर ठरवू शकतो परंतु आपण अनुभवच नाही घेतला तर आयुष्यला मजा नाही.

जास्तीत जास्त Casual राहिल्यामुळे लोक तुमच्या जवळ येतात. उगाच मोठेपणाचा आव नाही आणला पाहिजे. आपण बऱ्याचवेळा जमिनीवर बसलं पाहिजे. अंगा खांद्याला माती लागली पाहिजे. सांगायचे तात्पर्य काय तर आपण नेहमी ‘Down to earth’ राहायला शिकलं पाहिजे. त्यातूनच लोकांशी नाळ तुटणार नाही असं मला वाटतं. या Quarantine च्या काळात आपण कोणाला स्पर्श तर करु शकत नाही, भेटू शकत नाही आणि ते पाळलं पाहिजे आपण. परंतु अशी बरीच लोकं असतील ज्यांच्याशी आपण संपर्कात नसू. त्यांना एखादा फोन किंवा व्हिडिओ कॉल करुया. तुटलेली नाळ कदाचित परत जोडली जाऊ शकते.

आता जगावर परिस्थितीच अशी ओढावली आहे की सक्तीने आपल्याला घरी बसायला भाग पाडले आहे. आपण त्याचे पालन केले पाहिजे. ते आपले कर्तव्यच आहे. आणि हे सर्व करत असताना वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. खाद्यसंस्कृती असेल किंवा एखादं गाणं त्यातील म्युझिक किंवा शब्द. तसेच पेंटिंग, फोटोग्राफी किंवा एखादं पुस्तक. अग्दी निखळ गप्पा मारणं किंवा जवळच्या व्यक्तींसोबत म्हणजे कुटुंबासोबत ‘Leisure Time’ घालवणं जमलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी कळत नकळत लई शिकवून जातात. जीवनाच्या धावपळीत आपण हे सगळं करायला प्राधान्य देत नाही आणि हळू हळू वर्षे निघून जातात.

 

म्हणून मी नेहमी म्हणतो… ‘आयुष्य थांबत नसतं!’
आपल्याला आहे तसं जगता आलं पाहिजे. थोडं वास्तवादी झालो तर काय हरकत आहे. Change is the only constant thing… म्हणून सतत बदलत राहिलं पाहिजे. Costliest thing in world is simplicity… म्हणून जास्तीत जास्त Simple राहिलं पाहिजे. आपली भाषा आहे तशी बोलली पाहिजे. या वेळात आपल्याला लिखाण करता येऊ शकतं. व्यक्त होऊ शकतो मग माध्यम कोणतेही असूदेत. जे जे Raw असतं ना ते लई भारी असतं… त्याचा Feel घेतला पाहिजे. घरातील लई वस्तूंना तर किती महिने स्पर्श केला नसेल. तो स्पर्श करत असताना ती वस्तू तुम्हाला एखादी आठवण देऊन जाईल. शक्यतो सुखदच आठवण असेल. साधं सोपं राहत फार काही जग बदलायच्या कल्पना न करता स्वत:च स्वत:ची काळजी घेऊन घरच्यांची काळजी घेतली पाहिजे. स्वत:ला नव्याने ओळखण्यासाठी हा वेळ सदुपयोगी लावू शकतो. आयुष्य मस्तपैकी जगलं पाहिजे… जिंदगी वसूल केली पाहिजे!

लेखक - प्रज्ञेश शैलजा ज्ञानेश्वर मोळक (साकू)

लेखक हे झिवा स्टूडिओज् चे क्रिएटिव्ह डायरेक्टर असून बऱ्याच कला क्षेत्रातील लोकांना ते सतत जोडत असतात. ते एक उत्तम फोटोग्राफर व प्रवासी आहेत. तसेच अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.